प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास दहावी, बारावीच्या परीक्षांवर बविष्कार घालण्याचा इशारा.
प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.यासंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज अहमद देसाई, सचिव संदेश कडव, श्रीधर शिगवण, मानसी शिंदे, भाग्यश्री हिरवे, सरोजा आखाडे, शशिकांत त्रिभुणे आदींनी शिक्षणाधिकारी बी. एम. कुंभार यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संघटनेच्या मागण्या योग्य असून त्यात मार्गी लावाव्यात, असे निर्देश दिले होते. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून या मागण्यांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.www.konkantoday.com