देव-घैसास-कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात रक्तदान शिबीर

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात रत्नागिरी दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी आयक्यूएसी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित स्व स्वरूप संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने‌ सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्रीराम मंदिर संस्था अध्यक्षा व टाइम्स ग्रुप संचालिका मा. सौ. उर्मिला घोसाळकर , स्व स्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समितीचे जिल्हा निरीक्षक श्री. संदीप नार्वेकर, तसेच समितीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती अनिता जाधव, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील , राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सहा.प्रा. ऋतुजा भोवड आणि इतर प्राध्यापक वर्ग तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमांचे प्रास्ताविक ॲड. नेत्रा कामत यांनी केले व सामजिक बांधिलकीच्या उद्देशाने रक्तदान केले पाहिजे असे सांगितले.रक्तदान ही काळाची गरज आहे.

रक्तदान केल्याने कोणतेही नुकसान होत नसुन त्याचा फायदा हा रक्त देणा-यास व रक्त घेणा-यास होतो असा संदेश देत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी रक्तदान करण्यास स्वयंसेवकांना आवाहन केले व शिबिरास शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी रक्तदान केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची व समाजसेवेची भावना निर्माण करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट या शिबिराच्या माध्यमातून साध्य झाले.या शिबिरामध्ये एकूण 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे सूत्रसंचालन कु. अमिषा मडके हिने केले. तसेच आभार प्रदर्शन ईश्वरी पवार हिने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button