
थिबाराजकालीन बुद्धविहार ट्रस्ट बरखास्त नाही, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार.
थिबाराजा कालीन बुद्धविहार स्थळे विकास चॅरिटेबल ट्रस्ट बरखास्त करण्यात आलेली नाही. १२ जानेवारी रोजी झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत आपण सभा बरखास्त करावी, असे बोलला होता. ट्रस्टची स्थापना समाजाच्या मान्यतेने झाली आहे. त्यामुळे ट्रस्ट बरखास्त करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.
काही मोजकेच लोक प्रस्तावित जागेत कम्युनिटी सेंटर बांधण्यास विरोध दर्शवत असले तरी त्यांना समाजाचा पाठिंबा नाही, त्यामुळे त्याच ठिकाणी कम्युनिटी सेंटर उभारण्यात येईल, असे स्पष्टीकरण ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी दिले.www.konkantoday.com