चिपळूण शहरातील खाजगी जागेतील नाले, पर्‍ह्यांचा ताबा पालिकेने घ्यावा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी.

ज्या ठिकाणी जेसीबी पोहचत नाही, तेथील नाले व पर्‍हे यांच्यातील गाळ कित्येक महिने काढला जात नाही. परिणामी पावसाळ्यात पाणी तंबूत सखल भागात पाणी साचते. तर नाले-पर्‍हे हे खाजगी जमिनीमध्ये असल्याने त्यालगत अतिक्रमणांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने अशा जमीनी ताब्यात घ्याव्यात आणि मनुष्यबळाचा वापर करून पावसाळ्यापूर्वी नाले-पर्‍हे यांच्यातील गाळ काढावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी सोमवारी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button