कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चिपळूण बसस्थानक प्रश्‍न लवकरच मार्गी लावणार.

कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चिपळूण बसस्थानकाच्या नव्या हायटेक इमारतीच्या कामाला ८ वर्षे उलटली तरी प्रकल्पाचा पाया तयार झालेला नाही. बसस्थानकाचा कारभार एका पत्र्याच्या शेडखाली चालवला जात असल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकांच्या पूर्णत्वासाठी वाढीव निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली असता यासंदभांत लवकरच बैठक घेवून हा विषय मार्गी लावण्याची ग्वाही परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.या संदर्भात आमदार शेखर निकम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक इमारत नूतनीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया २०१६ मध्ये निघाली होती. हे काम एका कंपनीला मिळाले होते. त्यांनी ते २०१९ पर्यंत पूर्ण करायचे होते.

इमारतीच्या पायाचे अर्धे काम करून काम परवडत नाही म्हणून अर्धवट स्थितीमध्ये सोडून दिले. त्यानंतर महामंडळाने या कामाचा ठेका संबंधित कंपनीकडून काढून घेतला. त्यानंतर नवीन निविदा चिपळूण बसस्थानकाची पुनर्बांधणी करणे या नावाने ८ डिसेंबर २०२० या वर्षात ३ कोटी ७० लाख रुपयांची संकेतस्थळावर जाहीर केली. परंतु या कालावधीमध्ये कोरोना महामारीमुळे व महामंडळाकडे निधी उपलब्ध नसल्याने ही निविदा मंजुरीसाठी २० महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर जुलैमध्ये या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. परंतु अद्यापही चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक इमारतीचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button