
कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला.
राजापूर तालुक्यातील मौजे करक तांबळवाडी येथील श्री. आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या नवीन बांधकाम चालू असलेल्या घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला असल्याची माहिती पोलीस पाटील करक यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनीवरून दिली. ही घटना सोमवारी घडली.
बिबटया अडकल्याची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिस्थिती लक्षात घेऊन प्रथमदर्शी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रिन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावण्यात आला. बिबट्या अडकला असलेल्या खुराड्याच्या लोखंडी तारा कापून त्याला पिंजऱ्यात सुरक्षित घेण्यात आले