कला प्रदर्शनातील चित्रे नव्हे तर सर्व शिल्पे देखील बोलकी -बबन माने.
सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून मन आनंदित झाले. येथील विद्यार्थी घेत असलेली मेहनत पाहता, त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच. येथील केवळ चित्रेच नव्हे तर सर्व शिल्पदेखील बोलकी आहेत. राज्य कला प्रदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड होणे, हेच या कला महाविद्यालयाचे खरे यश आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील चित्रकार बबन माने यांनी केले.
सह्याद्री कला महाविद्यालयातील प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात चित्रकार श्री. माने हे बोलत होते.उदघाटक म्हणून उद्योजक प्रशांत गोविंदराव निकम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार बबन माने, चित्रकार विजय उपाध्ये, शिल्पकार संदीप ताम्हणकर, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, अनिरूद्ध निकम आदी उपस्थित होते.www.konkantoday.com