अजित यशवंतराव यांनी ८०० विद्यार्थ्यांना दिली मोफत ई पुस्तके

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अन्य भागातील १० वी व १२ वीत गेलेल्या ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना स्वखर्चाने मोफत ई पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. यावर्षी कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल याचा अंदाज नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके कधी मिळतील हे कळत नाही. त्यासाठी यशवंतराव यांनी पुढाकार घेवून १० वी व १२ वीत गेलेल्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने मराठी व इंग्र्रजी माध्यमातील मोफत ई पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button