
मी अद्याप राजीनामा दिलेला नाही. नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्यास माझी काही हरकत नाही-बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी मोठा खुलासा केला आहे. मी अद्याप राजीनामा दिलेला नाही. नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्यास माझी काही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दिल्ली वारीनंतर बाळासाहेब थोरात बोलत होते.
www.konkantoday.com