
*राजापूर मतदार संघातील २३४ रामभक्त अयोध्येला रवाना*_______
राजापूर—– प्रभू श्रीरामांचा जयघोष करत राजापूर-लांजा -साखरपा विधानसभा मतदार संघातील २३४ रामभक्त दर्शनासाठी आस्था ट्रेनने अयोध्येला रवाना झाले. भाजपा नेत्या, राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी भगवा झेंडा दाखवत यात्रेचा शुभारंभ केला.भारतीय समाजमनाचा मानबिंदू असलेल्या मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. देशविदेशातील रामभक्तांनी हा दिव्य सोहळा याची देही याची डोळा पाहिला. भक्तगणांच्या या आस्थेचा सन्मान करत भारतीयजनता पार्टीने आपले नैतिक दायित्व व अध्यात्मिक जाणिवेतून आस्था ट्रेनच्या माध्यमातून लोकांना रामदर्शनाचा लाभ देण्याचा संकल्प केला. आस्था ट्रेन पनवेल ते अयोध्या प्रवास करणार असून एकूण १२५० रामभक्त अयोध्येला निघाले आहेत. यात राजापूर विधानसभेतील २३४ रामभक्तांचा समावेश आहे.www.konkantoday.com