सिंधुदुर्गचा सुपुत्र असल्याचा अभिमान!-विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर.

देवातांच्या उत्सवांची संस्कृती कोकणात रुजली आहे. येथील पिढ्या ही संस्कृती पुढे नेत आहेत. मातोंड, पेंडूर व अन्य गावात साजरे होणारे देवीचे उत्सव त्याच परंपरेने उत्साहात साजरे होतात.धार्मिक उत्सवांसोबत सभ्यता व सौम्यता कोकण भूमीत आहे. माझीही नाळ तळकोकणशी जुळली असून सिंधुदुर्गचा सुपुत्र असल्याचा मला अभिमान आहे.

असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मालवण- पेंडूर येथे केले.महाराष्ट्र विधानसभेचे सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपद भूषविणारे अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मालवण-पेंडूर येथील ऐतिहासिक त्रैवार्षिक मांड उत्सवाला भेट देत श्री देवी जुगाई देवी व श्री देव वेताळ यांचेसमोर नतमस्तक होत दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्ट कमिटी, बारा-पाच मानकरी, गावकर मंडळी, ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button