
दोन दिवसाचं पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता
महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आज, ५ जुलै आणि उद्या, ६ जुलै अशा दोन दिवसांत हे अधिवेशन पार पडणार आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळं विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत.
www.konkantoday.com