
मिर्या-नागपूर महामार्गाचे रखडलेल्या जमिनींचे भूसंपादन पूर्णत्वाकडे.
मिर्या नागपूर महामार्ग-१६६ चे काम रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहे. यासाठी रत्नागिरी शहरानजिकच्या रखडलेल्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील २८ गावांतील १५९ हेक्टर इतके क्षेत्र संपादित करण्याचे काम आता पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. दोनही तालुक्यातील महामार्गादरम्यान येणार्या २४ बांधकामापैकी २२ बांधकाम हटवण्यात आली आहेत. शहरानजिकच्या नाचणे गावातील भूसंपादनाच्या रकमेचे वाटप लवकरच लाभार्थ्यांना करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर काही वर्षानी सुरू झालेले मिर्या-नागपूर महामार्ग-१६६ च्या भूसंपादनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील २८ गावांमधील १५९ हेक्टर इतके क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १३ आणि संगमेश्वर तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. यापैकी नाचणे येथील काही वाढीव बांधकामासंदभांत भूसंपादनाची रक्कम लवकरच अदा करण्यात येणार अस्याचे उपविभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.www.konkantoday.com