
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचा 25 जानेवारी रोजी साईनगर येथे मासिक स्नेह मेळावा
रत्नागिरी : कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता साईनगर येथील श्री साई मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात येतील. तरी या स्नेह मेळाव्याला ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. मारुती अंब्रे आणि उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम यांनी केले आहे.