आता सरकारी कर्मचार्‍यांचे जिल्हा बँकेत जमा होणार पगार

गेल्या पाच वर्षातील उत्तम आर्थिक कामगिरी लक्षात घेता राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन, निवृत्तीवेतन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या १५ जिल्हा बँकांमध्ये कोकणातील रत्नागिरी, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्हा बँकांचा समावेश आहे.

सलग १२ वर्षे रत्नागिरी जिल्हा बँकेचा नक्त एन.पी.ए. ० टक्के असून, बँकेला सलग १३ वर्षे अ ऑडीट वर्ग प्राप्त झघला आहे. त्यामुळेच बँकेला राज्य शासनाचे सरकारनिष्ठ व सहकार भूषण या दोन पुरस्कारांसह अन्य १७ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button