रत्नागिरी शहरातून बांगलादेशी महिलेला अटक.

रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथून शहर पोलिस आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत सलमा बोंबल (30) या बांगला देशी महिलेला ताब्यात घेतले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पासपोर्ट तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही महिला भारतात राहात असल्याचे एटीएसच्या निदर्शानास आल्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला आहे.

दरम्यान, मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विनय नरवणे, पोलिस अंमलदार स्वप्नील तळेकर तसेच रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार शरद जाधव, कौस्तुभ जाधव व महिला पोलिस अपर्णा सुर्वे मिळून संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.ही महिला गेल्या 4 ते 5 वर्षांपासून रत्नागिरीत वास्तव्याला असून ती घरकाम करते. तिच्या पतीचे रत्नागिरीत दुकान असल्याची माहितीदेखील समोर येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button