![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250118-WA0007-780x470.jpg)
पुस्तक आदान-प्रदानाचा उपक्रम : मराठी साहित्याचा गौरव
पै फ्रेंड लायब्ररी आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिले ‘पुस्तक आदान-प्रदान’ कार्यक्रमाला राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दरवर्षी होणाऱ्या विश्व मराठी संमेलनात हा उपक्रम आयोजित करण्याचे आश्वासन पै फ्रेंड लायब्ररीला आयोजकांना दिले. यासोबतच, हा उपक्रम डोंबिवलीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
मराठी भाषा आणि साहित्याचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे, याचा अभिमान असल्याचं मतं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केले. या वेळी माजी मंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, डॉ. इंदु राणी जाखड, रवींद्र शिसवे, गुलाब वजे तसेच विविध मान्यवर व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.