
तळगांव मध्ये लगान क्रिकेट क्लब राणेवाडी तर्फे शिष्यवृत्ती सराव चाचणी चे आयोजन
राजापूर तालुक्यातील तळगांव मधील लगान क्रिकेट क्लब राणेवाडी मंडळ नेहमी शैक्षणिक उपक्रम राबवत असतात. यावर्षी दि २१ जानेवारी २०२५ ला तळगांव व शेजवली केंद्र अंतर्गत पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी चे आदर्श केंद्र शाळा तळगांव नं १ मध्ये आयोजन करण्यात आले आहे. सराव चाचणी मध्ये तळगांव व शेजवली केंद्र शाळेतील विद्यार्थी साठी ठेवण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती सराव चाचणी मधील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लगान क्रिकेट क्लब राणेवाडी तर्फे मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम दि २४ जानेवारी ला तळगांव शाळा नं १ च्या सांस्कृतिक कार्यक्रम वेळी देण्यात येईल.