ठाकरे सेनेच्या त्या पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार.
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी उद्धवसेनेच्या नेत्यांकडे कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी न देता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.तसेच, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे.
लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईसह कोकण पट्ट्यात उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण महाविकास आघाडी विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी काम केले. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केली, असा आरोप करत अशा व्यक्तींना पदावरून हटविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी उद्धवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना लवकरच पदावरून दूर करण्यात येणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले.