
क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडाजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता.
रत्नागिरी दि. १७ : “क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर दिनांक 7 जानेवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हाये (Ease of Living) कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रशासनास येत्या 100 दिवसात प्राधान्याने करावयाच्या कार्यवाही करावयाची आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय व कर्यालय परिसरामध्ये आज अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत स्वच्छता मोहिम पार पडली.

या स्वच्छता मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासमवेत अन्य उपजिल्ल्हाधिकारी, तहसीलदार, कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन मोहिम यशस्वी केली.