कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू.
कोकण रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वे गाडीची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास संगमेश्वरजवळील कोंड असुर्डे येथे रेल्वे रुळावर घडली.संगमेश्वजवळच्या असलेल्या जांभूळवाडी या ठिकाणी रेल्वे रुळावर बिबट्या मृत्युमुखी पडला असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी वन विभागाला दिली.
बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक सुरज तेली, वनरक्षक अरुण माळी यांच्यासह पोलिस पाटील सुभाष गुरव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.यात बिबट्याचा रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याचे दिसून आले.