काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेवर टीका, मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्विकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्विकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक आहे, असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.मराठीचा मुद्दा सोडून शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि RSS ला मदत केली. शिवसेनेच्या त्या चुकीमुळे मुंबईचं गुजरातीकरण होतं आहे, असं दलवाई यांनी म्हटलं आहे.मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्विकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक आहे, मराठीचा मुद्दा सोडून शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि RSS ला मदत केली.
शिवसेनेच्या त्या चुकीमुळे मुंबईचं गुजरातीकरण होतं आहे, शिवसेनेनं मराठीचा मुद्दा आता पुन्हा हातात घ्यावा, असं दलवाई यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर हे संकट आलं आहे, मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतोय, असंही यावेळी दलवाई यांनी म्हटलं आहे. दलवाई यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.