उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोकणटुडेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
कोकणातील व रत्नागिरीतील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या हेतूने गेली अनेक वर्षे कोकणटुडेच्या वतीने कोकणातील निसर्गांची छायाचित्रे असलेली दिनदर्शिका दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकणटुडेचे संपादक सुदेश शेट्ये, उपसंपादक प्रणित शेट्ये, उद्योजक अनिल गावडे, नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, बिपीन बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील कोकणातील छायाचित्रकारांना या दिनदर्शिकेत स्थान देण्यात आले असून यातील नेत्रदीपक छायाचित्रे रत्नागिरीतील प्रसिद्ध हौशी छायाचित्रकार सिद्धेश वैद्य, हौशी छायाचित्रकार रोहित जाधव, तसेच आपल्या छोट्याशा मोबाईलमधून अप्रतिम छायाचित्रे टिपणारा व जागतिक स्पर्धेत बक्षीस मिळवणारा पावस येथील आदित्य भट यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. यामुळे ही दिनदर्शिका यावेळी देखील लक्षवेधी ठरली आहे