
जिल्ह्यातील सर्व धरणांवर पहारेकरी, चौकीदार पहारा करणार
तिवरे (ता. चिपळूण) धरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पावसाळ्यापूर्वी पावले उचलण्यात आली आहेत. कोरोनाची टाळेबंदी सुरू असतानाही प्राथमिक दुरुस्त्या करून घेण्यात आल्या असून सर्व धरणे सुस्थितीत आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणांवर पहारेकरी, चौकीदार नेमण्यात आले आहेत. कुवारबाव येथील सिंचन भवनात पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पूर्ण झालेले एकूण १ मध्यम व ३० लघु पाटबंधारे, ५ को. प. बंधारे असे एकूण ३६ बंधारे आहेत.
www.konkantoday.com