
दापोली तालुक्यातील केळशी सागरी महामार्गाचा नियोजित मार्ग बदलला.
दापोली तालुक्यातील केळशीच्या दक्षिण आणि पश्चिमेकडून केळशी खाडीपुलाकडे जाणारा गावालगतचा दक्षिणेकडचा रस्ता रद्द केल्याचे अधिकृत माहिती विशेष ग्रामसभेत देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. यामुळे अनेक गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.
शिवाय सुमारे २० वर्षापूर्वी केळशी येथे शेतात माती टाकून केलेल्या रस्त्यामुळे ग्रामस्थांची शेतीही वाया गेली असून हातीही काही लागलेले नाही. यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन करण्याची तयारी ठेवली आहे.केळशी खाडीपुलाचे काम सुरू करण्यासाठी अवजड वाहनाची ये-जा करण्यासाठी गावातून समुद्राकडे जाणारा एकही रूंद रस्ता नसल्यामुळे ठेका घेणार्या कंपनीचे अभियंते व अधिकार्यांनी ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिल्यानंतर विशेष सभा घेण्यात आली. पूर्वीचा बेलेश्वर त दर्ग्यापर्यंतचा मार्ग रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com