![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/01/download-6-10.jpeg)
दापोली कोकण कृषी विद्यापीठात राज्यातील पहिले ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रसिक्षण स्थापन करण्यास नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार कृषी विद्यापीठात महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम वर्गातील ड्रोन चालवणारे पहिले प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा मान दापोली कृषी विद्यापीठाला प्राप्त झाला आहे.नागरी विमान वाहतूक महा संचालनालयाच्यावतीने संचालक आणि सहाय्यक संचालक यांनी विद्यापीठाला भेट देवून ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा यांची तपासणी करून त्याचा अहवाल महासंचालनालयाला सादर करण्यात आला.
त्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक डॉ. पराग हळदणकर, डॉ. सतीश नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा निर्माण केल्या असून लवकरच प्रशिक्षणाला सुरूवात होणार असल्याची माहिती वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रभारी आणि प्रकल्प प्रमुख डॉ. संतोष सावर्डेकर यांनी दिली. पीबीसी एरोहा पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला असून प्रशिक्षण केंद्र संयुक्त विद्यमाने चालवण्यात येणार आहे.www.konkantoday.com