सैफने त्याच्या चाहत्यांना शांत राहण्याचा आणि धीर धरण्याचं आवाहन केलं.

अभिनेता सैफ अली खानवर रात्री अडीच वाजताच्या सुमारास राहत्या घरात चाकून हल्ला झाला करण्यात आला. घरात घुसलेल्या चोराने हा हल्ला केला असून यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे.सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सैफवर सर्जरी करण्यात आली आहे. सैफच्या हातावर, पाठीवर आणि मणक्यावर वार करण्यात आलेत. सैफच्या हातावर रात्रीच सर्जरी करण्यात आली. त्यानंतर आता तातडीने सैफच्या मणक्याची सर्जरी करण्यास करण्यात आली आहे. जवळपास दीड तास सर्जरी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

सैफ अली खानचे अधिकृत वक्तव्य समोर आलं आहे. सैफ म्हणाला, मी धोक्याबाहेर आहे. घरात चोरीच्या प्रयत्नाला सैफ अली खानने दुजोरा दिला आहे. सैफने त्याच्या चाहत्यांना शांत राहण्याचा आणि धीर धरण्याचं आवाहन केलं आहे.चोरट्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सैफ अली खान आणि चोर यांच्यात बाचाबाची झाली. चोरट्याने सैफवर चाकूने पाच-सहा वार केले. घरात एकच चोरटा घुसला होता. याप्रकरणी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button