
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा घाटात गुरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला.
गुरांची अवैध वाहतूक करणार्या व्यक्तीला रंगेहाथ पकडून त्याच्या ताब्यातील चार बैल व टेम्पो असा सुमारे 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैभववाडी पोलिसांनी बुधवारी सकाळी भुईबावडा घाटात ही कारवाई केली.याप्रकरणी राजाराम ऊर्फ राजू नारायण बनसोडे (रा. केरवडे, ता. गगनबावडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.गोहत्या बंदी कायदा असताना गुरांची राजरोस वाहतूक करून विकणार्या टोळ्या कार्यरत आहेत.
भुईबावडा घाटातून अशाप्रकारे गुरांची वाहतूक करून विक्रीसाठी नेत असल्याचे पोलिसांना खबर्यांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी पोलिस कॉन्स्टेबल राहुल तळस्कर, वाहतूक पोलिस कृष्णांत पडवळ यांनी भुईबावडा घाटात सापळा लावून घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा टेम्पोची तपासणीकेली असता, टेम्पोतून चार बैल घेऊन जात असल्याचे दिसून आले.सदर टेम्पो ताब्यात घेऊन वैभववाडी पोलिस ठाणेत आणून संबंधिताची चौकशी करून कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैद्य पशु वाहतूक प्रकरणी बनसोडे यांच्या विरोधात गोहत्या प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे