
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध, तरुणाविरोधात गुन्हा.
लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती आठ महिन्यांची गरोदर राहिली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात २२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ मे ते जून २०२४ या कालावधीत लांजा शहरात ही घटना घडली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून राज राजू वर्मा (२२, रा. लांजा) या तरुणाने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तरुणीने सुरुवातीला १२ जानेवारी रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही तक्रार झिरो नंबरने १३ जानेवारी रोजी लांजा पोलीस ठाण्याला ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाल्यानंतर लांजा पोलिसांनी राज राजू वर्मा या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाडे का करत आहेत.www.konkantoday.com