
आगामी कोकण पदवीधरसाठी कॉंग्रेस देणार उमेदवार, नाना पटोले यांची घोषणा
आगामी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. विधान परिषदेची आगामी कोकण पदवीधर निवडणूक कॉंग्रेस लढवणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत म्हटले आहे.मागील काही महिन्यांपासून कॉंग्रेस पदाधिकार्यांनी कोकण विभागात पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, माकपासह इतर मित्रपक्ष यांची महाविकास आघाडी असून कॉंग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. www.konkantoday.com