
भूकंपग्रस्त दाखला वितरण संदर्भातील निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य अव्वर सचिव महसूल यांना दिले माहिती घेण्याचे दिले आदेश,
रत्नागिरी:- मुंबई- पात्र भूकंपग्रस्त वंचित राहू नयेत म्हणून भूकंपग्रस्त दाखला वितरणातील काही जाचक अटी शिथिल कराव्यात, आणि भूकंपग्रस्ता संदर्भातील झालेल्या 1995 चा शासन निर्णयामध्ये सुधारणा करून पीडितांना न्याय द्यावा, या विश्वास मोहिते यांच्या मागणीची दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून राज्याच्या अव्वर सचिव महसूल सखोल माहिती घेण्याची आदेश दिल्याने बहुतांशी भूकंपग्रस्तांचे प्रश्न सुटतील, अशी आशा भूकंपग्रस्तांना वाटत आहें. भूकंपग्रस्त दाखल्याबद्दलच्या विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे राज्यातून कौतुक होत आहे.
1967साली झालेल्या भूकंपातील पीडितांना दाखला वितरणातील जाचक अटीमुळे भूकंपग्रस्त दाखला आणि सरकारी नोकरी पासून वंचित राहावे लागत असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष आणि पाडळी केसे तालुका कराड गावचे सुपुत्र विश्वास मोहिते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भूकंपग्रस्त दाखला वितरणातील काही जाचक अटी आणि राज्य शासनाचे निर्णयातील संधीग्ध अर्थ यामुळे शेकडो कुटुंबे भूकंपग्रस्त दाखल्यापासून वंचित राहिले असल्याचे विश्वास मोहिते यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. विश्वास मोहिते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनामध्ये 1995 चा शासन निर्णय पाहता आजोबा -वडील -मुलगा- भाऊ नातू अविवाहित बहीण या शासन निर्णयामध्ये अशा पद्धतीची कुटुंबाची व्याख्या करण्यात आली होती.
परंतु भूकंपग्रस्त मदत यादीमध्ये जर मोठ्या भावाचे नाव असेल आणि त्याचा सख्खा लहान भाऊ जर अज्ञान असेल आणि एकत्रित कुटुंब असेल शिवाय त्या अज्ञान भावाचा उदरनिर्वाह हा मोठ्या भावाच्या उत्पन्नावरतीच अवलंबून असेल . मग तो भूकंपग्रस्तच असेल ना? मग त्या अज्ञान भावाच्या पश्चात त्यांच्या मुलांना भूकंपग्रस्त दाखला देणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.हे निवेदन देत असताना भूकंपग्रस्त पात्र असताना कुटुंबे कशी वंचित राहिले आहेत.
ह्या देखील बाबी विश्वास मोहिते यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. त्याच बरोबर भूकंप ग्रस्त वितरणातील इतर जाचक अटी रद्द करून पात्र जास्तीत जास्त लोकांना भूकंपग्रस्त दाखले वितरण करावे अशी मागणी निवेदनात केली होती. मागणी वरती योग्य ती कार्यवाही होण्याची मागणी ही विश्वास मोहिते यांनी केली होती. विश्वास मोहिते यांनी केलेल्या भूकंपग्रस्त दाखला वितरणातील मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल सचिव यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे काही भूकंपग्रस्त नागरिकांना याचा भविष्यामध्ये फायदा होणार असल्याने भूकंपग्रस्त नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्याला यश येणार असल्याने भूकंपग्रस्त कुटुंबांकडून विश्वास मोहिते यांना धन्यवाद दिले जात आहेत.
भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे नागरिक या नात्याने आपल्या वरती राज्यातील कोणत्याही घटकावर ती आणि होत असेल त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पाठपुरावा करणे आमचे काम आहे. संविधानिक लढा दिला की यश मिळतेच. यात काळी मात्र शंका बाळगण्याचे कारण नाही. भूकंपग्रस्त दाखला वितरणातील काही जाचक अटी आणि शासन निर्णयातील संधीग्ध अर्थ याबाबत मुख्यमंत्री यांची पत्रव्यवहार केला. त्या पत्रावरती मुख्यमंत्री महोदयांनी माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना मी धन्यवाद देतो. विश्वास मोहितेसामाजिक कार्यकर्ते