पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, खुनाच्या” गुन्ह्यामध्ये 2 जणांना अटक.
दिनांक १४/०१/२०२५ रोजी दापोली तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेने आपला पती निलेश दत्ताराम बाक्कर रा. गिम्हवणे हा बेपत्ता झाल्याबाबतची खबर दापोली पोलीस ठाण्यामध्ये दिली व त्यावरून बेपत्ता दाखल करण्यात आलेला होता. सदर बेपत्ता व्यक्तीचा तपास सुरू असताना चौकशी दरम्यान खबर देणाऱ्या बेपत्ता व्यक्तीची पत्नी ज्या हॉटेल मध्ये काम करत होती तेथून कामावरुन रात्री ११.३० वाजता घरी आलेली होती असे तिने आपल्या दिलेल्या खबरीमध्ये सांगीतले होते.
प्रत्यक्षात बेपत्ता इसमाचा शोध घेत असताना बेपत्ता व्यक्तीच्या पत्नीने खबर देते वेळी पोलीसांना सांगीतलेली घरी येण्याची वेळ व ती प्रत्यक्षात कामावरून निघून गेल्याची वेळ यामध्ये तफावत दिसून आल्याने तसेच बेपत्ता व्यक्तीचा मोठा भाऊ दिनेश दत्ताराम बाक्कर याने त्याचेकडे चौकशी दरम्यान आपल्या वहिनीवर संशय व्यक्त केलेला होता.
पोलीसांमार्फत बेपत्ता व्यक्तीच्या पत्नीनेकडे अधिक तपास करण्यात आला व तपासात असे निष्पन्न झाले की, बेपत्ता व्यक्तीची पत्नी व तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर रा. पालगड, दापोली या दोघांनी संगनमताने तिचा पती निलेश दत्ताराम बाक्कर यास हर्णे-बायपास येथील मोकळ्या जागेत घेऊन जाऊन त्यास जास्त प्रमाणात दारू सेवन करण्यास भाग पाडून त्याचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून जिवे ठार मारण्यात आले व पुढे त्याच्या मृतदेहाला चार-चाकी गाडीतून नेऊन पालगड-पाटील वाडी येथील रस्त्या लगतच्या विहिरीत त्याचे अंगावर चारचाकी गाडीचा तुटलेला लोखंडी पाटा बांधून टाकण्यात आलेले होते.असे कृत्य करून स्वत:ला सदर घटनेपासून नाम-निराळे ठेवण्याकरिता तिने तिचा पती निलेश बाक्कर हा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असल्याचे चौकशी दरम्यान सांगीतले आहे.
या गुन्ह्या मध्ये पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. भगुजी औटी, पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहीरे व पथकाने नीलेश दत्ताराम बाक्कर यांचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीतून बाहेर काढून दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८, ३(५) अन्वये गुन्हा नोंद करून गुन्हयाचे अनुषंगाने १) मंगेश शांताराम चिंचघरकर रा. पालगड, दापोली व २) मृत नीलेश दत्ताराम बाक्कर याच्या पत्नीस अटक करण्यात आलेली आहे. या कारवाई मध्ये खालील नमूद पोलीस पथकाने कामगिरी केलेली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. भगुजी औटी, पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहीरे, दापोली पोलीस ठाणे, स.पो.नि श्री. प्रविण देशमुख, दापोली पोलीस ठाणे, पोउनि श्री. राजकुमार यादव,सपोफौ /७२७ अशोक गायकवाड,पोहेकॉ/१७८ अभिजित पवारपोकॉ /४४० विकास पवार, पोकॉ/७४० सुहास पाटील, पोकॉ/३४५ सुरज मोरे, पोकॉ/१८८ रोहीत लांबोरे, पोकॉ/२०८ मिथुन मस्कर, पोकॉ/२४७ ज्ञानेश्वर मडके, चापोकॉ/४६७ गमरे व पोना/१५५६ वळवी.