
दापोली आगारात येणार नव्या को-या एसटी बस इलेक्ट्रिक बसही धावणार लवकरच दापोलीच्या रसत्यांवर.
दापोली :- दापोली आगारामध्ये सर्व चालक व वाहक हे प्रशिक्षित असून आगारातील बसेसही शासनाच्या मानांकना नुसार आहेत. त्यामुळे एखादा झालेला अपघात ही मानवी चूक असू शकते त्यामुळे प्रवाश्यांच्या सेवेसाठी आम्ही अहोरात्र कटीबद्ध असल्याचे मत दापोलीचे आगार प्रमुख श्री राजेंद्र उबाळे यांनी सांगितले.
दापोली आगारातील दाभोळ मुंबई या बसला झालेल्या अपघाताबाबत माहिती विचारण्यासाठी आगार प्रमुख उबाळे यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाकडून महामंडळाच्या मालकीच्या २३०० बसेस येणार असून यातील काही बसेसचे लोकार्पण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथे केले आहे. रत्नागिरी विभागाला लकरात लवकर बसेस मिळाव्यात यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत दापोली आगारामध्ये सध्या शिवशाही व सध्या अश्या मिळून ७० बसेस असून दापोली आगराला किमान एकूण ८० बसेसची आवश्यकता आहे. आपण वरिष्ठांकडे २० नव्या बसेसची मागणी केली असून पहिल्या टप्प्यात १० बसेस येण्याचे शक्यता आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक प्रकारातील सुमारे ३६ बस पुढच्या २ महिन्यात दापोली आगराला मिळण्याची शक्यता आहे. दापोली आगाराकडे तुळजापूर, अक्कलकोट, नांदेड, गेवराई(बीड), पाजपंढरी- मुंबई, भडवळे- मुंबई अशा नव्या फेऱ्यांची मागणी वारंवार केली जात आहे. त्यामुळे नव्या बसेस मिळाल्यावर दापोली आगरातून यातील काही फेऱ्या सुरू करण्यात येतील.
दापोली आगारातील सर्व चालक वाहक हे शासनाच्या नियमाप्रमाणे प्रशिक्षित असून विभाग नियंत्रक श्री बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांना जास्तीत जास्त सुखकर आरामदायी व सुरक्षित सेवा देण्यासाठी दापोली आगार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.