
जिल्हा क्रीडा कार्यालय व रत्नागिरी जिल्हा आर्चेरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० वर्षांखालील जिल्हास्तरीय आर्चेरी स्पर्धेचे आयोजन.
दि. १५ जानेवारी रोजी राज्यक्रीडादिना निमित्ताने रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय व रत्नागिरी जिल्हा आर्चेरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० वर्षांखालील जिल्हास्तरीय आर्चेरी स्पर्धेचे आयोजन केले होते. एन एक्स आर्चेरी शूटिंग रेंज, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मारुतीमंदिर येथे सकाळी १०.३० वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ५ ते १० वर्षे वयोगटातील १५ खेळाडू सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी केली. झोरे स्पोर्ट्स अकॅडमीच्या मानस साईप्रसाद संजीवनी मोरे याने प्रथम क्रमांक पटकावला.

द्वितीय क्रमांक स्वरीत सौंदेकर व तृतीय क्रमांक पार्थ जैतपाल यांनी पटकावला. दोघेही गुहागर तालुक्यात अभिषेक पालकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकरिता प्रमुख पाहुणे कु.अपुर्वाताई किरण सामंत उपस्थित होत्या. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजयजी शिंदे, रत्नागिरी जिल्हा आर्चेरी असोसिएशनच्या सचिवा समिधा संजय झोरे, उपाध्यक्ष व प्रशिक्षक श्री. मार्तंड संजय झोरे, क्रीडाअधिकारी गणेश जगताप उपस्थित होते.यावेळी अपुर्वाताईंनी छोट्या खेळाडूंशी संवाद साधला.

सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अपुर्वाताईंनी चॉकलेट वाटले. तसेच पालकांशीही संवाद साधला. आपल्या भाषणात त्यांनी असोसिएशन व जिल्हा क्रीडा कार्यालयाला खेळाच्या प्रगती साठी सामंत कुटूंबीय कायम पाठीशी उभे राहिल असे आश्वस्त केले आहे.क्रीडा क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणारे गुरुवर्य कै.संजय दिनकर झोरे यांच्या स्मरणार्थ कु.अपुर्वाताई किरण सामंत यांना श्री. विजय शिंदे व श्री. मार्तंड झोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे, क्रीडा अधिकारी श्री गणेश जगताप, प्रशिक्षक श्री अभिषेक पालकर व सर्वात जास्त खेळाडू सहभाग असलेल्या ग्लोबल स्कूलच्या प्रतिनिधी कु. केतकी सावंत या मान्यवरांनाही राष्ट्रीय पदक विजेते श्री. मार्तंड झोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व खेळाडूंना पदकं देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमती समिधा संजय झोरे यांनी सर्व खेळाडूंना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
