
एसटी महामंडळ आणत असलेल्या नव्या ऍपमुळे प्रवाशांना कळणार बसचे ठिकाण.
एस.टी. नेमकी कोठवर आली याची उत्सुकता प्रवाशांना असते. सध्या अशी माहिती मिळवण्यासाठी मोठी अडचण येते. यावर मार्ग काढण्यासाठी ऍप बनवण्याचे काम राज्य परिवहन महामंडळाकडून सुरू झाले आहे. रोस मार्टा नावाच्या कंपनीला रूट मॅपिंगचे काम देण्यात आले आहे. हे काम पूर्णत्वास गेले असून लवकरच ते कार्यवाहीत येण्याची अपेक्षा आहे.राज्यभरात सुमारे ५० हजार मार्गावर एस.टी.च्या सव्वा लाख फेर्या होत असतात. लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. रा. प. महामंडळाच्या सर्व बस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीममध्ये आणण्यात आल्या आहेत. त्याची जोडणी ऍपसाठी करण्यात आली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणार्या प्रवाशांना बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली. मधल्या थांब्यावर नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नसे.
महामंडळाने तयार केलेल्या प्रणालीमध्ये बसचे थांबे आणि निवडलेल्या स्थानकांमध्ये येण्याचा अपेक्षित वेळ हे २४ तास आधी समजू शकणार आहे. महामंडळाने रोस मार्टा नावाच्या कंपनीला रूट मॅपिंगचे काम दिले होते. ते पूर्ण झाले आहे. प्रणालीमध्ये ते समाविष्ट करण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. सध्या प्रणालीत सर्व बाबी एकत्रित करण्याचे काम सुरू असून येत्या काही आठवड्यात ते पूर्णत्वास जाईल असे अधिकार्यांचे म्हणणे आहे.www.konkantoday.com