अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केंद्र शासनाची भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसह विविध योजनांची अंमलबजावणी ऑनलाईन
रत्नागिरी, दि. 16 : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केंद्र शासनाची भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निर्वाह भत्ता योजना (विद्यावेतन) यांची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईनरित्या करण्यात येत आहे.
त्यामुळे या योजनांचा सन २०२४-२५ मध्ये लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करावे. तसेच २०२३-२४ व त्यापूर्वीच्या वर्षांत त्रुटीमुळे अर्ज महाविद्यालयस्तरावर अथवा विद्यार्थीस्तरावर प्रलंबित असल्यास विद्यार्थी व त्यांचे पालकांनी संबंधित महाविद्यालयाकडे तात्काळ त्रुटीपूर्तता करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.