
एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात घट
एसटी महामंडळाचा कारभार दिवसेंदिवस तोटय़ात जात असून आता एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील घट करण्यात येणार आहे डिझेलची टंचाई व विविध कारणामुळे एसटीचे वाहतूक मध्यंतरी विस्कळीत झाली होती त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता रत्नागिरी आगाराचा विचार करता कर्मचार्यांच्या पगारासाठी एक कोटी तेवीस लाख रुपयांची आवश्यकता असते परंतु एसटी महामंडळाकडे ९७लाख रुपये जमा आहेत त्यामुळे एसटी कर्मचाऱयांच्या पगारात कपात होणार आहे .
www.konkantoday.com