
जगभरात साजरा झाला राम मंदिराचा सोहळा; टाईम स्क्वेअरवर झळकली रामाची प्रतिमा
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी भारतासह परदेशात देखील आनंदाचे वातावरण झाले आहे.भाविकांच्या जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्येतील रस्ते दुमदुमून गेले आहेत. राम भक्तांचा हाच जल्लोष अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर येथे देखील पाहायला मिळाले.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर येथे रामभक्तांची मोठी गर्दी जमली. तसेच ढोल ताशांचा गजर पाहायला मिळाला. यावेळी भारतीय महिलांनी राम आयेंगे गाण्यावर नृत्याचा आनंद घेतला. तसेच रामाची गाणी, भजन-कीर्तन म्हणत लोक म्हणताना दिसत आहे. येथील काही व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
www.konkantoday.com