
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रशासन सज्ज, १ हजार कर्मचार्यांची कुमक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या ७ मे रोजी पार पडलेल्या हायव्होल्टेज मतदानाचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. या मतमोजणीच्या तयारीत प्रशासकीय यंत्रणा गुंतली असून सुमारे १ हजार कर्मचार्यांची कुमक तयार ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. मतमोजणीच्या २५ फेर्यांमधून निकालाचे अंतिम चित्र दुपारी २ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात तिसर्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान पार पडले. त्यामध्ये ४ लाख ५९ हजार ९९ इतक्या पुरूष तर ४ लाख ४८ हजार ५१८ इतक्या महिला अशा एकूण ९ लाख ७ हजार ६१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदार संघात ६२.५२ टक्के इतके मतदान झाले. रत्नागिरीतील एफसीआय गोदाम येथे ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या मतमोजणीसाठी शिपायापासून वरिष्ठ अधिकार्यापर्यंत सुमारे १ हजार कर्मचारी लागणार आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत यंत्रणा नियोजनात गुंतली आहे.मतदार संघातील रत्नागिरी व राजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान केंद्र आहेत. त्यामुळे येथे मतमोजणीच्या २५ फेर्या होणार आहेत. सर्वाधिक कमी मतमोजणीच्या फेर्या या कुडाळ मतदार संघात होणार आहेत. येथे मतदान केंद्राची संख्या कमी आहे. प्रत्येक फेरीची माहिती ही निवडणूक विभागाला द्यायची आहे. त्यांच्याकडून सुचना आल्यानंतर दुसर्या फेरीची मतमोजणी होणार आहे.www.konkantoday.com