सिंधुदुर्गात पत्नीनेच काढला प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधात पतीचा असलेला अडथळा दूर करण्यासाठी पत्नीनेच प्रियकर व त्यांच्या दोन भाच्यासह आपल्या पतीचा निर्घृण खून केला. हा खून लपविण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचला.पूर्वनियोजित कट रचून शिवा उर्फ शिवाप्पा कृष्णाप्पा नायक (28, सध्या रा. मारुती मंदिरजवळ कुडाळ, मूळ रा. विजापूर, राज्य कर्नाटक) याला जीवे ठार मारून राहत्या घरी गळफास घेतल्याचा बनाव करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नी सुनंदा उर्फ सोनाली शिवाप्पा नायक (25, सर्व सध्या राहणार कुडाळ, मूळ रा. काळगीतांडा, विजापूर) व तिचा प्रियकर सिताराम बाबू राठोड (30) यासह अन्य दोघांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नी सुनंदा हिला कर्नाटक येथून अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.दरम्यान यातील अन्य तिघेजण फरार असून यातील एका संशयितांची मालवाहक गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button