रत्नागिरीतील सर्व संगीत रसिकांना आर्ट सर्कलचे आवाहन.

आजपासून बरोबर 10 दिवसांनी आपला अठरावा संगीत महोत्सव सुरू होत आहे. संगीत महोत्सवाचे हे तीन दिवस रसिकांसाठी आणि राजवाड्याच्या वास्तूसाठी सुध्दा मंतरलेले असतात. ह्यावर्षी तर संगीत महोत्सवानंतर लगेचच दोन दिवसाचा नाट्य महोत्सव पण होतोय. गेली सतरा वर्ष जे विविध कार्यक्रम सादर झाले ते केवळ आपल्यासारख्या रसिकांच्या पाठबळामुळेच! मंडळी धडपडतायत, वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतायत ना, मग आपल्याला सगळं आवडो अथवा न आवडो, आपण ह्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे ह्या एकमेव हेतूने मायबाप रसिकांनी हे सगळे उपक्रम आजपर्यंत सांभाळून घेतले.

अर्थात संस्थेने सुध्दा गेली सात वर्ष सभासद योजनेच्या रकमेमध्ये कोणताही बदल केला नाहीये तोसुद्धा एकाच हेतूने की, अत्यल्प रकमेत सर्वोत्तम कार्यक्रम देता यावेत. पुढील 10 दिवसांत जास्तीत जास्त सभासद व्हावेत यादृष्टीने सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. जेणेकरून हे पाच कार्यक्रम झाल्यानंतरसुध्दा काही कार्यक्रम देता येण्याची शक्यता वाढावी.

आपण वार्षिक सभासद झाला नसाल तर नक्की व्हा. आणि झाला असाल तर अजून एक सभासद जोडून द्या.*सभासद योजना शुल्क बैठक व्यवस्थेनुसार रु. 1000, 2000, 3000 प्रती सभासद असे आहे.ह्यापेक्षा जास्त रक्कम देऊन प्रायोजकत्व सुध्दा घेता येईलच. तरी सर्व रसिकांना नम्र विनंती… रत्नागिरीची सांस्कृतिक ओळख होऊ पाहणाऱ्या ह्या उपक्रमांना पाठबळ द्या. खाली दिलेल्या upi id वर पेमेंट करून आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा. आम्ही सभासद कार्ड आणून देऊ.artcircleratnagiri@sbiअधिक माहितीसाठी संपर्क:संपर्क : दिप्ती 7775877606.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button