
मुंबई-गोवा महामार्गांवर बहादूरशेख नाका येथे भरधाव आयशर टेम्पोने मोटरसायकलला धडक दिल्याने एक जण ठार.
मुंबई-गोवा महामार्गांवर बहादूरशेख नाका येथे भरधाव आयशर टेम्पोने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८.४५ वा.च्या दरम्यानं घडली. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.रात्री बहादूरशेख नाका येथे रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पोने चिपळूण कराड रोडने बाजारपेठेकडे जाणाऱ्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार विनोद नामदेव राठोड (२८, दिग्रस, यवतमाळ) हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मोटार सायकलच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला