मारुती मंदिर ते आठवडा बाजार काँक्रिटीकरण रस्त्याच्या दुतर्फा ‘नो पार्किंग झोन’
रत्नागिरी, दि. 15 :- रत्नागिरी शहरामध्ये 10 जानेवारी पासून मारुती मंदिर ते आठवडा बाजार चौक या दरम्यान रस्त्याचे काँक्रिटी करण्याचे काम सुरु असल्याने, रस्त्याचे एका मार्गिकेवरुन दोन्ही कडील वाहतूक चालू करण्यात आलेली आहे. एका मार्गिकेवरुन वाहतूक सुरळीतपणे चालू रहाण्याकरिता रस्त्याचे दुर्तफा लावण्यात येणा-या वाहनांना निर्बंध घालणे आवश्यक आहे. रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना नो पार्किंग झोन होणे आवश्यक आहे.
वाहतुकीची कोंडी टाळण्याकरीता मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 115 अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी, चंद्रकांत सूर्यवंशी यांनी 10 जानेवारीपासून मारुती मंदिर ते आठवडा बाजार चौक या दरम्यान रस्त्याचे काँक्रिटी करण्याचे काम सुरु असल्याने, एका मार्गिकेवरुन वाहतूक सुरळीतपणे चालू रहाण्याकरिता रस्त्याच्या दुर्तफा लावण्यात येणा-या वाहनांना निर्बंध घालण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने न लागण्याकरिता नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केला आहे.
वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे व वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाकडून करण्यात यावी, असेही आदेशात नमूद आहे.