मध्य, दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणार सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

मध्य, दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर तेजस, दुरांतो सुपरफास्ट स्पेशल ट्रेन धावणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही गाड्या पूर्णतः आरक्षित आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई (सीएसटी) करमाळी तेजस एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल्स (एलटीटी)-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे. तेजस सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबईहून दर मंगळवार, गुरूवार, शनिवार सकाळी १०.५० वा. सुटून त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता करमाळीला पोहोचेल. दि. ९ जुलैपासून करमाळीहून दर बुधवार, शुक्रवार, रविवारी दुपारी १२ वा. सुटणारी तेजस एक्स्प्रेस पहाटे १.१५ वाजता मुंबईला पोहोचेल. दि. १० जुलैपासून एलटीटीहून दर मंगळवार, शनिवारी रात्री ८.५० वा. सुटणारी दुरांतो एक्स्प्रेस दुसर्‍या दिवशी सायंकाळी ७.३० वा. एर्नाकुलमला पोहोचेल.
दि. १० जुलैपासून एर्नाकुलम येथून दर बुधवार, रविवारी रात्री ९.३० वा. सुटणारी दुरांतो एक्स्प्रेस दुसर्‍या दिवशी रात्री ९.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल्स कुर्ला येथे पोहोचणार आहे. सदर गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून या दोन्ही गाड्या पुढील महिन्यांपासून सोडण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button