अखिल मराठा महासंमेलनासाठी सुहासी रविंद्र चव्हाण यांच्याकडून भरीव मदत.
रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच होणाऱ्या अखिल मराठा महासंमेलनासाठी सुहासी रविंद्र चव्हाण आणि भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी भरीव मदत केली आहे. आयोजक मराठा मंडळाकडे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी ही मदत आज सुपुर्द केली.येत्या १८ व १९ जानेवारीला माळनाका येथील मराठा मैदानावर हे महासंमेलन होणार आहे. ५७ क्षत्रिय मराठा मंडळे, संस्थांचे फेडरेशन २०१५ साली तयार करण्यात आले. त्यानंतर दोन महासंमेलने यशस्वीपण आयोजित केली. तिसरे महासंमेलन रत्नागिरीत होत आहे.
याकरिता मराठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांची रत्नागिरीत गेल्या महिन्यात भेट घेतली होती. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले होते. या महासंमेलनाकरिता मदतीचे आश्वासन आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिले होते. ही मदत श्री. चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या माध्यमातून प्राप्त झाली.ही मदत आज मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सुपुर्द केली. या वेळी भाजपा मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे व दादा दळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संकेत कदम, विनोद सावंत, नीलेश आखाडे, सुशांत पाटकर, संदीप सुर्वे, गिरीधर पटवर्धन आदी उपस्थित होते.