
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर चिपळूण दौर्यावर
चिपळूण येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपळूण दौर्यावर येत असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हेदेखील चिपळूण दौर्यावर येत आहेत त्यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हेदेखिल रत्नागिरीत येत आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाडला भेट देऊन चिपळूणमध्ये दाखल होणार आहेत तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे रत्नागिरी विमानतळावर हेलिकॉप्टरने येऊन चिपळूणकडे प्रयाण करणार आहेत
www.konkantoday.com