मार्क पाहिजे असतील तर मला खूश ठेवावे लागेल असे सांगून दहावीतल्या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या त्या शिक्षकाला अटक करून पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील स्टँड जवळ असलेल्या नावात महिला असलेल्या विद्यालयात दहावीतील विद्यार्थिनीला गुलाबाच्या झाडाच्या फांद्या लावण्याच्या बहाण्याने मार्क पाहिजे असतील, तर मला खूश ठेवावे लागेल, असे सांगत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाला शहर पोलिसांनी अटक केली. प्रथमेश चंद्रकांत नवेले (रा. नाचणे, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. आता या शिक्षकाविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वा. सुमारास घडली.
या बाबत पीडित विद्यार्थीनीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पीडिता ही 10 वीमध्ये शिकत असून 9 जानेवारी रोजी दुपारी 1 वा. सुमारास शाळेत शेती व पशुपालन या विषयाचे प्रॅक्टिकल सुरु होते. त्यावेळी पीडितेसह तिच्या मैत्रीणी अशा एकूण तिघीच बॅचला होत्या. प्रॅक्टिकल शिकवण्यासाठी त्या शिक्षकाने गुलाबाच्या फांद्या आणल्या होत्या. त्यांचे कलम कसे तयार करायचे, हे शिकवत असताना गुलाबाची रोपे पिशवित लावण्यास सांगितले. तेव्हा पीडितेच्या दोन्ही मैत्रिणी माती आणण्यासाठी प्रॅक्टिकल रुमच्या बाहेर मैदानात गेल्या होत्या. तेव्हा शिक्षक प्रथमेश नवेलेने पीडिता एकटीच असल्याची संधी साधत तिच्या जवळ जात थांब तुला फांदी कापायला शिकवतो, असे म्हणाला. त्यावर पीडितेने त्याला नको, असे सांगितले.
तरीही त्याने पीडितेचा हात धरुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच मार्क पाहिजे असतील तर मला खूश ठेवावे लागेल, असे म्हणाला. तेव्हा पिडीता घाबरुन प्रॅक्टिकल रुमच्या बाहेर निघून गेली होती. त्यानंतर घाबरल्यामुळे तिने दोन दिवस याबाबत कोणालाही सांगितले नव्हते.
अखेर तिला या धक्कादायक प्रसंगामुळे अस्वस्थ वाटू लागल्यावर तिने 11 जानेवारी रोजी हा सर्व प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. तेव्हा त्यांनीही नवेले सर आपल्या सोबतही असेच अश्लिल प्रकार करत असल्याचे त्यांनी पीडितेला सांगितले. पीडीतेच्या मैत्रिणीने ही सर्व हकिकत पीडीतेच्या आईला फोनव्दारे कळवल्यानंतर सोमवार 13 जानेवारी रोजी या सर्व विद्यार्थीनींचे पालक शाळेत धकडले.पालकांनी हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितल्यानंतर प्रथमेश नवेलेने या सर्व विद्यार्थीनी खोटे बोलत असल्याचा कांगावा करत उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्याने या प्रकरणात हस्तक्षेप करून पालकांवर हात उगारणार्या शिपायाला देखील चांगला चोप देण्यात आला त्या नंतर पालकांनी संतप्त होत या शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या शिक्षकाला पालकांच्या ताब्यातून सोडवत चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलींनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.