
पतितपावन मंदिर सावरकरांनी बांधले असा खोटा इतिहास 8 वी च्या पुस्तकात छापण्यात आला आहे तो तात्काळ बदलण्याची मागणी.

श्रीमान भागोजी शेठ कीर यांनी बांधलेले पतितपावन मंदिर सावरकरांनी बांधले असा खोटा इतिहास 8 वी च्या पुस्तकात छापण्यात आला आहे तो तात्काळ बदलण्यात यावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात येईल असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुर्यवंशी यांना निवेदन देताना भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, उपाध्यक्ष श्री कांचन मालगुंडकर , परिट समाजाचे श्री प्रभाकर कासेकर ,कट बु समाजाचे अध्यक्ष बी टी मोरे, राजेंद्र विलणकर, सुरेंद्र घुडे, काका तोडणकर, अण्णा लिमये, सदानंद मयेकर , दिलीप भाटकर उपस्थित होते.
