
चिपळूण नगरपालिका पावसाच्या पाण्याचे संधारण, सोलर पॅनल बसविणार्यांना मिळणार मालमत्ता करात ५ टक्के सूट
सार्वजनिक अथवा खाजगी इमारतीवर पावसाच्या पाण्याचे साधारण (रेन वॉट हार्वेस्टींग) व सोलर पॅनल बसविणार्या नागरिकांना आता आपल्या मालमत्ता कर रक्कमेत ५ टक्के सूट मिळणार आहे. चिपळूण नगर पालिका प्रशासनाने तसा निर्णय जाहीर केला आहे. शहरातील मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.चिपळूण नगरपालिकेमार्फत ओल्या कचर्यापासून खत निर्मिती करणार्या शहरातील काही गृह संकुलांना मालमत्ता करात ५ टक्के सूट दिली जात आहे.
नागरिकांनी आपल्या घरातील व परिसरातील कचरा, पाण्याचे व्यवस्थापन करावे, विजेची बचत करून सौर उर्जेचा वापर करावा, यासाठी चिपळूण नगर पालिका प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. शासनाकडून अशा नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. याच अनुषंगाने आता जे मालमत्ताधारक आपल्या सार्वजनिक अथवा खाजगी इमारतीवर पावसाच्या पाण्याचे साधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करतील तसेच सोलर पॅनल बसवतील अशांना मालमत्ता करात महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १२७ ब अन्वये ५ टक्के सूट देण्यात येणार आहे.www.konkantoday.com