
रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या मातेच्या पोटातच बाळाचा मृत्यू.
रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या मातेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात घडली.प्रकाराबाबत मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, तब्बल २४ तासानंतर डॉक्टर रुग्णालयात दाखल झाले.शस्त्रक्रिया करून मृत अर्भकाला बाहेर काढण्यात आले. मंडणगड येथील एका गर्भवती महिलेला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल केले होते. मात्र, या रुग्णालयात डॉक्टरच न आल्याने महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचे विदारक चित्र समोर आले.